Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वर्सोवा चौपाटी स्वच्छतेसाठी 'बीच क्लीनिंग मशीन'


मुंबई - वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी निवड झालेल्या संस्थेद्वारे साफसफाईची कार्यवाही नुकतीच सुरू झाली आहे. चौपाटी सफाईसाठी सहा वर्षांचे कंत्राट देण्यात आले असून त्यासाठी २२.२४ कोटी एवढा खर्च येणार आहे. चौपाटीच्या स्वच्छतेसाठी लवकरच अत्याधुनिक बीच क्लीनिंग मशीन आयात केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. 

सुप्रसिद्ध वर्सेावा चौपाटीची साफसफाई दिवस-रात्र पद्धतीने दररोज केली जाते. या पार्श्वभूमीवर वर्सेावा चौपाटीच्या साफसफाईसाठी संस्था निवडीकरता राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचा कार्यादेश नुकताच देण्यात आला आहे. त्यानुसार स्पेक्ट्रम इंजिनीअर्स प्रा.लि. या संस्थेची निवड करण्यात आली आहे. संस्थेद्वारे वसार्ेवा चौपाटीच्या साफसफाईचे काम सुरू झाले आहे. या संस्थेद्वारे या कामासाठी एक अत्याधुनिक 'बीच क्लीनिंग मशीन' लवकरच आयात करण्यात येणार आहे. सध्या १२० कामगारांद्वारे वसार्ेवा चौपाटीची साफसफाई करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सागरी किनाऱ्यालगत असणाऱ्या व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या चौपाट्यांची साफसफाई महापालिकेद्वारेच दैनंदिन स्वरूपात नियमितपणे केली जाते. या अंतर्गत भरतीच्या दरम्यान समुद्राच्या लाटांबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्याची आणि चौपाटीवर उद्भवणाऱ्या इतर कचऱ्याची साफसफाई केली जाते. वर्सेावा चौपाटीची एकत्रित लांबी ही सुमारे ४.५ किलोमीटर असून रुंदी ही सुमारे ३५ ते ६० मीटर या दरम्यान आहे. वसार्ेवा चौपाटीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २ लाख ३२ हजार ५०० चौरस मीटर एवढे आहे. महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागांतर्गत येणाऱ्या वसार्ेवा चौपाटीवर पावसाळ्याच्या काळात दररोज सरासरी १३० मेट्रिक टन एवढ्या कचऱ्याची सफाई केली जाते, तर पावसाळ्याव्यतिरिक्तच्या ८ महिन्यांत ही सरासरी दररोज सुमारे ४५ मेट्रिक टन एवढी असते. यानुसार पावसाळ्याच्या काळात वसार्ेवा चौपाटीवर दररोज किमान १०० कामगारांनी साफसफाई करणे अपेक्षित आहे. तर उर्वरित ८ महिन्यांच्या कालावधीत दररोज ५० कामगारांनी काम करणे आवश्यक आहे. तसेच 'बीच क्लीनिंग मशीन'द्वारे साफसफाई करण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे झाली नसल्यास या दिवशी अतिरिक्त २० कामगार नेमणे आवश्यक असणार आहे. या संस्थेला अत्याधुनिक 'बीच क्लीनिंग मशीन'व्यतिरिक्त २ कॉम्पॅक्टर, २ ट्रॅक्टर इत्यादींसह आवश्यक ते साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करावे लागणार आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom