Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांत वाढ, एकाचा मृत्यू

मुंबई - मुंबईत सध्या बदलत्या वातावरणामुळे साथीचे आजार बळावले असून मुंबईकर विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यात मलेरिया ,डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या १५ दिवसांत मलेरियाचे २०५ तर डेंग्यूचे १८४ रुग्ण आढळून आले .त्यापैकी एका ३९ वर्षीय तरुणाचा मलेरियाने मृत्यू झाला.

मुंबईत दरवर्षी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो.सद्या मुंबईत ऑक्टोबर हिटने मुंबईकरांना पोळून काढले आहे.उन्हाच्या झळा व घामाच्या धारांनी मुंबईकर बेजार झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका मुंबईकरांना बसला असून विविध आजारांनी मुंबईकर आजारी आहेत.१ ते १५ ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत मलेरियाचे २०५ रुग्ण, लेप्टोचे ९, डेंग्यूचे १८४, एच१एन१चे १३, गॅस्ट्रो २५७, तर हेपेटायटीसचे ३२ असे एकूण ७०० रुग्ण आढळले.तर डेंग्यूचे संशयित २१७३ रुग्ण आढळले.यापैकी सांताक्रूझ येथील वाकोला पाईपलाईन येथील मलेरियाने आजारी असलेल्या ३९ वर्षीय तरुणाचा ८ ऑक्टोबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गतवर्षी याच कालावधीत मलेरियाचे ६१६, लेप्टो १८, डेंग्यू २१२, एच१एन१ -५, गॅस्ट्रो ५४६ तर हेपेटायटीसचे ८९ रुग्ण आढळले. त्यापैकी मलेरियाने १, डेंग्यूने ३ व हेपेटायटीसमुळे एकाचा असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमधील पंधरवड्यातील रुग्णांची तसेच मृतांची संख्या घटल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom