मेट्रोचे काम थांबल्याने आमदार तुकाराम कातेंवर हल्ला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोचे काम थांबल्याने आमदार तुकाराम कातेंवर हल्ला

Share This

मुंबई - शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर रात्री बाराच्या सुमारास तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षारक्षकासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३च्या कारशेड परिसरात काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोच्या कंत्राटदारांनेच हल्ला घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे. 

महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडचे काम सुरू आहे. दिवसरात्र चालणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे स्थानिक रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मेट्रोचे काम थांबवण्यासाठी काते यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा फक्त तात्पुरते काम थांबवण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा मेट्रो परिसरात ट्रकची ये-जा सुरू असल्याने काते आणि शिवसैनिकांनी तिथे जाऊन काम बंद पाडले. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर तलावारीने हल्ला करण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages