महापालिकेच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर दखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर दखल

Share This
मुंबई - जागतिक बँकेद्वारे जगभरातील विविध देशांमधील व्यवसाय सुलभतेचे विविध निकषांच्या आधारे 'डुइंग बिझनेस २०१९' हा अहवाल जागतिक बँकेने नुकताच प्रकाशित केला. गेल्यावर्षीच्या अहवालात १०० व्या क्रमांकावर असणारे भारताचे स्थान आता ७७ व्या स्थानापर्यंत उंचावले आहे. तर इमारत बांधकाम परवानग्यांबाबत गेल्या वर्षी भारताचे स्थान १८१ क्रमांकावर असणा-या देशाच्या स्थानाने ५२ व्या स्थानावर गरुडझेप घेतली आहे. हे स्थान उंचावण्यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेने राबविलेल्या 'ऑनलाईन बांधकाम परवानग्यां'सह इतर उपक्रमांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

बृहन्मुंबई महापालिकेने यशस्वीपणे राबविलेल्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने बांधकाम परवानगी देण्यासाठी लागणारा वेळ, बांधकाम परवानग्यांमधील टप्पे कमी करणे, बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी लागणा-या शुल्क आकारणीत कपात, सुस्पष्ट – सोपी व सर्वसमावेशक नियमावली इत्यादी बाबींचा समावेश आहे. या वर्षीचा 'डुइंग बिझनेस २०१९' हा अहवाल जागतिक बँकेने नुकताच प्रकाशित केला असून ज्यात बृहन्मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानग्यांबाबत राबविलेल्या विविध बाबींचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. जागतिक बँकेने आपल्या अहवालात नोंदविलेल्या निरीक्षणानुसार पूर्वी बांधकाम परवानग्यांसाठी १२८.५ दिवस लागत होते; हाच कालावधी आता कमी होऊन आता ६० दिवसांवर आला आहे. पूर्वी बांधकाम करण्यासाठी विविध ३७ प्रक्रिया होत्या, मात्र हीच प्रक्रिया संख्या आता कमी होऊन केवळ ०८ वर आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages