संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार कापणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

Share This
मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी ९ दिवस संप करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संपकरी बेस्ट कामगारांवर कारवाई केली जाणार असताना सत्ताधारी शिवसेनेच्या कामगार युनियनचे सदस्य असलेल्या कर्मचार्‍यांना मात्र याचा फटका बसणार नाही अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

कर्मचार्‍यांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी 9 दिवस संप केल्यामुळे बेस्टच कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेऊन हजारो बेस्ट कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण साडे चार हजार ते दहा हजारापर्यंत पगार कपात होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेच्या युनियन सदस्यांनी संप संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची मात्र पगार कपात होणार नाही, असे सांगितले जात आहे. .

दरम्यान, कर्मचार्‍यांच्या पगारात कपात होऊ नये यासाठी बेस्ट कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव मुख्य व्यवस्थापकांशी चर्चा करणार आहेत. संपाचे नऊ दिवस कर्मचार्‍यांना पगारी रजा देण्यात यावी, अशी मागणी शशांक राव करणार आहेत. पण बेस्टच्या नियमांनुसार जर एखादा कर्मचारी संपासाठी सुट्टीवर गेला तर त्याचा पगार कापण्यात येतो. त्यामुळे आता पगारवाढीसाठी संप करणार्‍या कर्मचार्‍यांना जानेवारीचा पूर्ण पगार मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages