बेस्ट संपामुळे एनएमएमटीच्या तिजोरीत भर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट संपामुळे एनएमएमटीच्या तिजोरीत भर

Share This

नवी मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलना दरम्यान, मुंबईत एनएमएमटीची सेवा काही प्रमाणात वाढवल्याने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या उत्पादनात सुमारे 5 लाखांची दैनंदिन वाढ झाली आहे. त्यामुळे बेस्ट संप काळात एनएमएमटीच्या तिजोरीत मात्र भर पडत आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून संप पुकारला आहे. मुंबईत सुरू असलेल्या बेस्ट संपादरम्यान एनएमएमटी उपक्रमाने मुंबईतील 14 मार्गावर नेहमी पेक्षा 40 ज्यादा बसेस सोडून जवळपास 100 अतिरीक्त फेर्‍यांची वाढ करताना प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती एनएमएमटीचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली.

एनएमएमटीने मुंबईच्या रस्त्यावर अतिरीक्त 40 बसेस सोडल्याने एनएमएमटीच्या दैनंदिन उत्पन्नात 5 लाखाने वाढ झाली आहे. एनएमएमटीचे सरासरी दैनंदिन उत्पन्न 35 ते 36 लाखाच्या घरात असते. बेस्ट संपा दरम्यान हे उत्पन्न किमान 40-42 लाखांपर्यंत जात असल्याचे शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages