पोदार शाळेच्या बसमध्ये गियर म्हणून चक्क बांबूचा वापर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोदार शाळेच्या बसमध्ये गियर म्हणून चक्क बांबूचा वापर

Share This

मुंबई - सांताक्रूझमधील पोदार शाळेच्या बसमध्ये गियरऐवजी चक्क बांबूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेले तीन दिवस अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. एका अपघातानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर खार पोलिसांनी स्कूलबसच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असले तरी त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. गियर बॉक्समध्ये बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीसाठी वेळ नसल्याने गियर म्हणून चक्क बांबूचा वापर केल्याचे यावेळी बसचालकाने पोलिसांना सांगितले.

खारमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या कारला पोदार शाळेच्या बसने धडक दिली. त्यानंतर त्या व्यासायिकाने बसचा पाठलाग केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या व्यवसायिकाने ही या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. गाडीला धडक देणाऱ्या बस चालकाशी माझा वाद झाला. त्यावेळी बसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर असल्याचे मी पाहिले. त्यानंतर मी पुरावा म्हणून या प्रकाराचे चित्रीकरण केल्याची माहिती व्यावसायिकाने पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिसांनी बसचालक राज कुमार याला ताब्यात घेतले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages