सीएसएमटी पूल दुर्घटना - स्ट्रक्चरल ऑडिटर देसाईंना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2019

सीएसएमटी पूल दुर्घटना - स्ट्रक्चरल ऑडिटर देसाईंना अटक


मुंबई- सीएसएमटी येथे गुरुवारी झालेल्या पुल दुर्घटनेप्रकरणी आज स्ट्रक्चरल ऑडिटर निरजकुमार देसाई यांना अटक करण्यात आली आहे. नीरज कुमारदेसाई यांनी चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आज पोलिसांनी कलम 304 (2) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नीरजकुमार देसाई यांना अटक केली. गुरुवार 14 मार्च रोजी सायंकाळी 7.40 वाजता सीएसएमटी येथील हिमालय पुल कोसळून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 31 जण जखमी झाले होते. त्यानंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचे केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रकरणी महापालिकेतील दोन अधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. तर तीन निवृत्त अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS