भाजप सरकार बिनडोक, नरेंद्र मोदी, अमित शहा महाडाकू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजप सरकार बिनडोक, नरेंद्र मोदी, अमित शहा महाडाकू

Share This
मुंबई - सध्याचे भाजप सरकार बिनडोक आहे. त्याचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. यवतमाळ येथील सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षाला सत्तेपासून दूर ठेऊन डाव्यांच्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रकाश आंबेडकर यांनी याआधी जुन्या नोटा चलनात आणू असे आश्वासन दिले आहे. पुलवामाबद्दल बोलू नका, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. मात्र आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार घटनेनं दिला असताना अशा पद्धतीनं का रोखलं जातं, असा सवाल आंबेडकरांनी यवतमाळमध्ये रॅलीला विचारला. आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं. दरम्यान या प्रकरणाकडे निवडणूक अधिका-यांनी जातीने लक्ष घातले असून, आयोगाने महाराष्ट्र भारिप महासंघाच्या कार्यालयाला नोटीस पाठवली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages