वंचित बहुजन आघाडीच्या जाहिनाम्यात महिलांच्या अधिकारांना प्रथम प्राधान्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2019

वंचित बहुजन आघाडीच्या जाहिनाम्यात महिलांच्या अधिकारांना प्रथम प्राधान्य


पुणे- लोकसभा निवडणूक 2019 चा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे , संविधानाचा सरनामा अनुसरुन आपला जाहीरनामा वंचित बहुजन आघडीने जाहीर केला आहे आणि महिलांच्या हक्क वर तो जास्त केंद्रित केला आहे.

स्त्रीकेंद्री, स्त्रीवादी भूमिकांचा स्वीकार वंचित बहुजन आघाडीचा अग्रक्रम आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील स्त्रीयांचा सहभाग, नेतृत्व भागीदारी घडवणे आणि वाढवणे. आरोग्य शिक्षण रोजगार निर्मितीत स्त्रीकेंद्री आणि स्त्रीवादी दृष्टीकोनांचा स्वीकार करेल, बलात्कार विरोधी कठोर कायद्यांबरोबरच व्यापक प्रबोधन मोहिमासह बलात्कारीत स्त्रियांच्या पुनर्वसनाचे योग्य प्रारुप विकसित करणार, स्त्री अभ्यासाचे विस्तारीकरण करुन हा विषय प्राथमिक शाळा ते महाविद्यालयापर्यंत सक्तीचा करणार, लिंगभाव समानतेचा केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणार, स्त्री अभ्यास केंद्रांची सध्याच्या सरकारकडून होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील स्त्री-अभ्यास केंद्रांना कायमस्वरुपी विभागांमध्ये रुपांतरीत करणार, शेतमजन, सालगडी, घरकामगार, ऊसतोड कामगार, कागद-काचपत्रावेचक, विकासबाधित आदिवासी तसेच असंघटीत, असुरक्षित क्षेत्रात कार्यरत स्त्री- पुरुष समूहांकरीत विशेष धोरण निर्मित करणार स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच विधीमंडळांमध्ये व पार्लमेंटमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असाव्यात असे वंचित बहुजन आघाडीचे धोरण राहील, स्त्रीयांसोबतच बालकांच्या मनवाधिकारांचे संरक्षण हा वंचित आघाडीचा अग्रक्रम राहिल, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

Post Bottom Ad