बाईक रॅलीला ईशान्य मुंबईतील तरूणाईचा प्रतिसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2019

बाईक रॅलीला ईशान्य मुंबईतील तरूणाईचा प्रतिसाद


मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान २९ एप्रिल रोजी होत असून मतदानापुर्वी प्रचारासाठीचा शेवटचा रविवार महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देतसार्थकी लावला. आज सुटीचा दिवस असल्याने तसेच येत्या शनिवारी दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार थंडावणार असल्याने मतदारसंघातील सर्वच भागात जास्तीत जास्त संख्येनेमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. मतदानाला आता अवघा एक आठवडा शिल्लक असल्याने एकत्र प्रचाराऐवजी महायुतीने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विविधगटागटांद्वारे प्रचारावर भर दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानापुर्वीचा शेवटचा रविवार बाईक रॅली आणि पदयात्रांसह मतदारांच्या घरोघरी जात वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सार्थकीलावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघातील विविध भागात फिरून थेट मतदारांशी संवाद साधताना दिसत होते. काहींनीतर सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदारसंघातील उद्याने, सार्वजनिक वाचनालये तसेच चहाच्या स्टॉल्स वगैरेंना भेटी देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. सुट्टी असल्याने महायुतीचे सर्व युवाव महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते. रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता, तर दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हाचारनंतर प्रचाराने उसळी घेतली. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वॉट्सअॅप,आणि ट्वीटरसारख्या समाज माध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचार नियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

बाईक रॅलीला प्रचंड प्रतिसाद -
ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंतनगर बेस्ट डेपो पासून मुलुंड बालराजेश्र्वर मंदिरापर्यंतनिघालेल्या या महाबाईक रॅलीत युवावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. विशेष करून महिला आणि महाविद्यालयीन तरूणींनीही बाईकवर स्वार होत महायुतीसाठी मतदानाचे आवाहन केले.यावेळी भाजप, शिवसेना आणि रिपाईच्या झेंड्यांमुळे परिसर महायुतीमय झाला होता.

Post Bottom Ad