गोरेगाव येथील जिमला भीषण आग सहा जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2019

गोरेगाव येथील जिमला भीषण आग सहा जण जखमी

मुंबई - गोरेगाव पूर्वेकडील एमेरल्ड क्लबच्या जीममधील स्टीमबाथला भीषण आग लागून सहाजण जखमी झाले. जखमींवर गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यांत एकजण ८० टक्के जखमी असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. 

गोरेगाव पूर्वेकडील रॉयल पाम इस्टेट येथील आरे रोडवर असलेल्या एक मजली क्लबच्या जीममधील स्टीमबाथला अचानक आग लागली. या जिममध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य असल्याने आग भडकली. धुराचे लोट, आणि आगीच्या ज्वालांमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन जम्बो टँकर दोन जेटीसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ४० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत सहाजण भाजल्याने त्यांना आधी सेव्हनहिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आता नवीमुंबईतल्या ऐरोलीतील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी एक ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

या आगीत जितेंद्र तिवारी (३३) (२० टक्के भाजले), अंकित मोंडलकर (२९) (८० टक्के भाजले), दिनेश सिंग (४३) (२० टक्के भाजले), संदीप शेट्टी (३०), (१२ टक्के भाजले), मनोज पंत (२१) १० टक्के भाजले) आणि राहुल सिंग (३९) (२० टक्के भाजले) असून यापैकी अंकित मोंडलकर हे ८० टक्के भाजले आहेत.

Post Bottom Ad