
राम माधव यांनी 'ब्लूमबर्ग'ला दिलेल्या एका मुलाखतीत हे मत व्यक्त केलं. उत्तर भारतातील ज्या राज्यात २०१४मध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. त्या राज्यात यावेळी भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. तर पूर्वेकडील राज्य आणि ओडिशा तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होईल. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर मित्रपक्षांशी मदत घ्यावी लागेल, असं माधव यांनी सांगितलं.