मुंबईत सलग तिसऱ्यादिवशी पाऊसधारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2019

मुंबईत सलग तिसऱ्यादिवशी पाऊसधारा


येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता -
मुंबई - मुंबईत शुक्रवारपासून दमदारपणे हजेरी लावलेल्या पावसाने सलग तिसऱ्या तिसऱ्या दिवशीही संततधार कायम ठेवली. समाधानकारक पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकराना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जून संपता संपता लांबलेल्या पावसाने शुक्रवारपासून जोरदार एन्ट्री घेतली आहे. रविवारी तिसऱ्या दिवशीही सकाळपासूनच पावसाने अधून मधून काहीशी उघडीप घेत जोरदार सरीने कोसळला. दुपारी दोन वाजेपर्यंत कुलाबा १२.४ व सांताक्रूझ येथे ८.२ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी पावसात भिजत एन्जॉय केला. मुंबईच्या समुद्र किनारीही अनेकांनी गर्दी करीत पावसाचा आनंद लुटला.
अरबी समुद्रात हवेचा दाब वाढला आहे. त्यामुळे कोकणच्या आजुबाजूच्या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४ दिवस, मुंबईसह ठाणे आणि इतर भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाची नोंद - (मिमी)
कुलाबा -- ७८.७
वरळी - ४४.८०
माझगाव -- ७२.७
दादर --- ३८.२०
वांद्रे -- ४२.६०
बिकेसी -- ११३.००
सांताक्रूझ -- ५२.८०
अंधेरी --- ८९.२०
गोरेगाव -- ९९.६०
मालाड --- १२५.६०
कांदिवली - ६५.६०
बोरिवली --- ४६.८०
चेंबूर -- ८२.८०
विद्याविहार --- ७६.६०
पवई ---७३.४०
जोगेश्वरी --- २२.००
भांडुप -- ६५.२०
मुलुंड --- ९९.२०

Post Bottom Ad