दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक

Share This

नवी दिल्लीः गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत दिली. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे १.५ लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही बाब चिंताजनक आहे. रस्ते अपघात रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण ४० टक्के आहे. अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी महत्त्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दुरुस्ती विधेयकामध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. देशभरात ३० टक्के वाहन परवाने बनावट आहेत. एखादी व्यक्ती ४-४ परवाने प्राप्त करू शकते, असे गडकरी यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या कोणत्याही अधिकारावर आम्हाला गदा आणायची नाही. हा राजकीय मुद्दा नाही. मात्र, बेकायदा गोष्टी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages