गणेशोत्सव मंडळांनी सजावटीचा निधी पूरग्रस्तांना द्या - समन्वय समिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशोत्सव मंडळांनी सजावटीचा निधी पूरग्रस्तांना द्या - समन्वय समिती

Share This

मुंबई - येत्या गणेश उत्सवात मुंबईतील मंडळांनी सजावटीवर अधिक खर्च न करता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने मंडळांना केले आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यावर सध्या पुराचं संकट ओढवले आहे. अशावेळी तेथील पूरग्रस्त बांधवांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यानुसार मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’सह अनेक मोठमोठ्या मंडळांनी त्यास प्रतिसाद दिला आहे. याआधीही प्रत्येक आपत्तीच्या वेळी गणपती मंडळे पुढे आली होती. आताही सजावटीवरील अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला जाईल, असा विश्वास आहे, असे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सांगली आणि कोल्हापुरात पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक बेघर झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सर्व स्तरातून त्यांना मदत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. कलाकार मंडळी, सामाजिक संस्था हे सगळेच आपापल्यापरीने साहित्य- सामुग्री कोल्हापूर आणि सांगलीला पोहोचवत आहेत. राज्य सरकारचा आपत्कालीन विभाग, एनडीआरएफ यांचे बचावकार्य सुरू आहे. अशा वेळी येत्या गणेशोत्सवात मंडप सजावटीवर हजारो रुपये खर्च न करता सार्वजनिक मंडळांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages