१७२८ गोविंदांवर पोलिसांची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१७२८ गोविंदांवर पोलिसांची कारवाई

Share This
मुंबई - दहीहंडी सण साजरा करताना मुंबईत गोविंदांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करण्यात आले. दिवसभरात वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी आणि वेगवेगळ्या नियम मोडणाऱ्या १७२८ जणांवर कारवाई केली. यामध्ये सर्वाधिक संख्या विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांची आहे. 

दहीहंडी उत्सव शांततेत आणि कोणत्याही नियमांचे उल्लंघन करता पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात होती. यामध्ये १५०३ दुचाकीस्वारांवर विनाहेल्मेट वाहन चालविल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. दुचाकीवर तिघांना बसविल्याप्रकरणी १९४ आणि दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १९४ चालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages