चैत्यभूमी येथे अखंड तेवणाऱ्या भीमज्योतीचे उदघाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चैत्यभूमी येथे अखंड तेवणाऱ्या भीमज्योतीचे उदघाटन

Share This

मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथील अशोक स्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या अखंड तेवणाऱ्या भीमज्योतीचे उदघाटन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. 

या शानदार सोहळ्यात रामदास आठवले यांच्या समवेत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे; राज्यमंत्री अविनाश महातेकर; महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजा सरवदे; पूज्य भदंत राहुल बोधी; खासदार राहुल शेवाळे; आमदार कालिदास कोलंबकर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ऍड. आशाताई लांडगे; डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती चे सरचिटणीस नागसेन कांबळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी समोर उभारण्यात आलेली भीमज्योत हा चांगला उपक्रम आहे. हा कार्यक्रम वाद न करता समाजाच्या एकजुटीने होत आहे. ही भीमज्योत आंबेडकरी समाजाला सदैव ऐक्याचा आणि सत्तेतील सहभागाचा; मोक्याच्या जागा जिंकण्याचा मार्ग दाखवितव राहिल असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages