काँग्रेसचे सहा आमदार आज भाजपात प्रवेश करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काँग्रेसचे सहा आमदार आज भाजपात प्रवेश करणार

Share This


मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठ्ठा धक्का बसला आहे.काँग्रेसचे विद्यमान सहा आमदार आज मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आज मोठी मेगा भरती होत आहे.काँग्रेसचे विद्यमान सहा आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज गरवारे क्लब येथे होणा-या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.या सहा आमदारांमध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, चिखलीमधील राहुल बोंद्रे, मालाडचे आमदार असलम शेख, शिरपूरमधील काशीराम पवार, साक्रीतील डी. एस. अहिरे, आणि पंढरपूरमधील भारत भालके यांचा समावेश असुन, हे सहाही आमदार आज अधिकृतपणे भाजप मध्ये. प्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज सोमवारी १२ वाजता, गरवारे क्लब,वानखडे स्टेडियम येथे होणा-या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages