सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना टोला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना टोला

Share This

मुंबई - अभिनेता सुमीत राघवन यानं ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावलं आहे. सुमीतच्या या ट्विटची राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीची घोषणा होताच आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. 'निवडणुकीची घोषणा झालीय. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय. 'तुमचं सरकार, तुमचं भवितव्य घडवण्याचा अधिकार बजावण्याची वेळ आलीय. हीच ती नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ आहे,' असं आदित्य यांनी ट्टिवमध्ये म्हटलंय. आदित्य यांच्या या 'नव्या महाराष्ट्रा'च्या ट्विटवर सुमीतनं अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिलीय. 'नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल,' असं त्यानं म्हटलंय. सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिलाय.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages