आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री - वरळीत बॅनर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री - वरळीत बॅनर

Share This

मुंबई - वरळी मतदारसंघातून शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा विजय झाला. काल मतमोजणी झाल्यावर आज दुसऱ्याच दिवशी वरळीत 'आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री' असे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

एकहाती सत्तेचे बिरुद मिरवणाऱ्या भाजपला राज्य विधानसभा निवडणुकीत केवळ १०५ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या ५४ जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला कोणताही शब्द दिला नसल्याचे जाहीर केले. तर शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे, शक्य नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोणाचा यावरुन घमासान सुरु होते. मात्र, निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. राष्ट्रवादीने आमच्या पाठिंब्यावर शिवसेनेने पाच वर्षे मुख्यमंत्री करावा, अशी पुष्टी सोडली आहे. कॉंग्रेसनेही शिवसेनेला सहकार्य करण्याचा ठरवले आहे. भाजपची यामुळे चांगलीच कोंडी झाली. केंद्रीय स्तरावरुन शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे.

शिवसैनिकांनीही आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री असे सुर लावले आहेत. शुक्रवारी मोठ्या संख्येने शिवसेना नेते, पदाधिकारी, शिवसैनिकांनी 'हीच ती वेळ', आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करावेत असे गाऱ्हाणे मातोश्रीला घातले. हनुमान सेवा मंडळ, त्रिमुर्ती धाम मंदिर, बी. सी. गुळवाला चाळ व रहिवासी मंडळाने 'भावी मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे' चे बॅनर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा हा तिढा वाढला आहे. तर शिवसेनेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहे.

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा, या प्रश्नावर केवळ मुख्यमंत्रीपद महत्वाचे नाही. तर लोकसभेच्या निवडणुकीवेळी युतीसाठी बनवण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसारच सरकार स्थापले जाईल, असे उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार हा फॉर्म्युला काय होता, हे जाणून घ्याचे असेल तर बीकेसीत पार पडलेल्या अमित शहांबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेची क्लिप पहावी, असा सल्लाही उध्दव यांनी भाजपचे नाव न घेता दिला. याच फॉर्म्युल्यानुसार या निवडणुकीत प्रत्येकी १४४ जागा लढवण्याचे ठरवण्यात आले होते. ते झाले नाही. आता आम्ही समजून घेऊ शकत नाही, असे सेना पक्षप्रमुखांनी भाजप नेत्यांना बजावले आहे. जे काही ठरवायचे ते एकत्र बसून ठरवू. यासाठी आवश्यकता पडली तर अमित शहा यांना मुंबईत देखील बोलवून घेऊ, असे देखील म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसचा पर्याय सध्या तरी दूर असला तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages