वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे ३२ उमेदवार पडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 October 2019

वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे ३२ उमेदवार पडले


मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे. 

चाळीसगावमध्ये भाजपच्या मंगेश चव्हाण यांना ८५ हजार २८६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख यांना ८१ हजार २८८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या राकेश जाधव यांना ३८ हजार ३६१ मते मिळाली.

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना ६७ हजार ३८ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना ३० हजार ८१० मते मिळाली. या ठिकाणी वंचितचे उमेदवार विजय शिंदे यांना तब्बल ४१ हजार १७३ मते मिळाली.

चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांना ९२ हजार ७६० मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना ८६ हजार ७२ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अशोक सुराडकर यांना या ठिकाणी ९ हजार ६०५ मते पडली.

सिंदखेड राजात राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ८० हजार ८०८ मते पडली. तर शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांना ७२ हजार ११ मते पडली. वंचितच्या सविता मुंडे यांना ३९ हजार ६१७ मते पडली.

खामगाव मतदार संघात भाजपच्या आकाश फुंडकर यांना ९० हजार १६७ मते मिळाली. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ४६४ मते मिळाली. वंचितचे उमेदवार शरद वसतकर यांना २५ हजार ८३९ मते मिळाली.

अकोटमध्ये भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांना ४८ हजार २९९ मते मिळाली तर काँग्रेसच्या संजय बोडखे यांना २७ हजार ५०१ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांना ४१ हजार १३९ मते मिळाली.

बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या नितीनकुमार टाले यांना ६८ हजार ९४५ मते मिळाली. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार २८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या संग्राम गावंडे यांना केवळ १६ हजार ३२९ मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान हाजी खान यांना ४४ हजार ३१३ मते मिळाली.

अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या गोवर्धन शर्मा यांना ७२ हजार ८३८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे साजीद खान यांना ७० हजार मते मिळाली. तर वंचितच्या मदन भारगड यांना २० हजार मते मिळाली.

अकोला पूर्वध्ये भाजपच्या रणधीर सावरकर यांना ९९ हजार ७५८ मते मिळाली. तर वंचितचे उमेदवार हरिदास भदे यांना ७५ हजार २६३ मते मिळाली. काँग्रेसच्या विवेक पारसकर यांना ९ हजार ४४४ मते मिळाली.

मुर्तीजापुरात भाजपच्या हरिश पिंपळे यांना ५९ हजार २४० मते मिळाली तर वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ५७ हजार ३९९ मते मिळाली. वंचितच्या उमेदवाराचा या ठिकाणी दोन हजारांहून कमी मताधिक्याने पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी ४० हजार ८४९ मते मिळाली.

वाशिममध्ये भाजपच्या लखन मलिक यांना ६५ हजार ६४१ मते मिळाली तर वंचितच्या सिद्धार्थ देओले यांना ५२ हजार ५० मते मिळाली. काँग्रेसच्या रजनी राठोड यांना ३० हजार ४९३ मते मिळाली.

धामनगाव रेल्वेत भाजपच्या प्रताप अडसाड यांना ९० हजार ३९३ मते मिळाली. तर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांना ८० हजार ९७८ मते मिळाली. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना २३ हजार ७०० मते मिळाली.

नागपूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या गिरीश पांडव यांना ७९ हजार ८८७ मते मिळाली. भाजपच्या मोहन मते यांना ८३ हजार ८७४ मते मिळाली तर वंचितच्या रमेश पिसे यांना ५ हजार ५३५ मते मिळाली.

बल्लाळपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ८५ हजार ६९७ मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ६१९ मते मिळाली. वंचितच्या ३९ हजार ७७९ मते मिळाली.

चिमुरमध्ये भाजपच्या बंटी भांगडिया यांना ८६ हजार ८५२ मते मिळाली. काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना ७७ हजार १४६ मते मिळाली तर वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४ हजार ३८४ मते मिळाली.

राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईके यांना ९० हजार ५३० मते मिळाली. काँग्रेसच्या वसंत पुरके यांना ८० हजार ७०६ मते तर वंचितच्या माधव कोहाले यांना १० हजार ६८२ मते मिळाली.

यवतमाळमध्ये भाजपच्या मदन येरावार यांना ७९ हजार ९१३ मते मिळाली. काँग्रेसच्या अनील मंगळुरकर यांना ७७ हजार २७८ मते मिळाली तर वंचितच्या योगश पारवेकर यांना ७ हजार ८१२ मते मिळाली.

अर्णी मतदारसंघात भाजपच्या डॉ. संदीप धुर्वे यांना ८१ हजार २४८ मते मिळाली. काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ८९ मिळाली तर वंचितच्या निरंजन मसराम यांना १२ हजार २५३ मते मिळाली.

किनवटमध्ये भाजपच्या भीमराव केराम यांना ८८ हजार ९७८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव यांना ७५ हजार ८६४ मते मिळाली तर वंचितच्या प्रा. हेमराज उईके यांना ११ हजार ६३९ मते मिळाली.

नांदेड उत्तर मधून शिवसेनेचे बाजाली कल्याणकर यांना ६१ हजार ९३४ मते मिळाली. काँग्रेसच्या डीपी. सावंत यांनी ४९ हजार ९१६ मते मिळाली तर वंचितच्या मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ३७६ मते मिळाली.

जिंतूरमधून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना १ लाख १६ हजार १४६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना १ लाख १२ हजार ५९७ मते मिळाली तर वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३ हजार १०७ मते मिळाली.

फुलंब्रीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना १ लाख ५ हजार ७५५ मते मिळाली. काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ५६० तर वंचितच्या जगन्नाथ रिठे यांना १५ हजार १९९ मते मिळाली.

पैठणमध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना ८३ हजार ६१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोर्डे यांना ६८ हजार ९८७ मते तर वंचितच्या विजय चव्हाण यांना २० हजार ५६४ मते मिळाली.

उल्हासनगमध्ये भाजपच्या कुमार आयलानी यांना ४३ हजार ५७७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना ४१ हजार ६३१ मते मिळाली तर वंचितच्या साजन सिंग यांना ५ हजार ६७७ मते मिळाली.

Post Bottom Ad