डॉन छोटा राजनचा भाऊ भाजपच्या तिकीटावर लढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2019

डॉन छोटा राजनचा भाऊ भाजपच्या तिकीटावर लढणार


मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी अनेक राजकीय नेते आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र याला अपवाद आरपीआय हा पक्ष ठरला आहे. मित्र पक्ष भाजपच्या कमळ या चिन्हावर आरपीआयचे सहा उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामधील फलटण या मतदार संघातून डॉन छोटा राजन यांचा भाऊ दिपक निकाळजे निवडणूक लढवणार आहेत. 

युतीकडून मित्र पक्षांना १८ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा जागा या रिपाइं पक्षाला मिळाल्या आहेत.शिवसेना-भाजप युतीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पक्षाने अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी जाहीर केली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना चेंबूरची जागा सोडण्यासाठी शिवसेनेने नकार दिला म्हणून त्यांना फलटणमधून लढावं लागत आहे. रिपाइंने निकाळजे यांना तिकीट दिल्यावर भाजप गुंडांना निवडणुकीत उतरवतंय अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. याआधी मोदींनी गुजरातमधून माफिया पुरुषोत्तम सोलंकी यांना निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यांना आपल्या सरकारमध्ये मंत्री केलं, असंही नवाब मलिक म्हणाले. मराठवाड्यातील नायगावमधून राजेश पवार, परभणीतल्या पाथरीमधून मोहन फड तर मानखुर्द-शिवाजीनगर आणि फलटणमधून अनुक्रमे गौतम सोनवणे आणि दिपक निकाळजे यांना रिपाइंने उमेदवारी देत असल्याचे आठवले यांनी जाहिर केले.

Post Bottom Ad