Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

विटंबना रोखण्यासाठी अॅट्रोसिटीच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करा - यशवंत जाधव


मुंबई - भारतीय संविधान आणि मुंबईतील राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तींच्या पुतळ्यांची विटंबना करणे आता अंगलट येणार आहे. महापालिकेने अशा कारवायाविरोधात अॅट्रोसिटीच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.  

भारतात पूरातन वास्तूंचा ठेवा आहे. राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तिंचे पुतळे आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवर अतिशय काळजीपूर्वक आणि पुरेशा दक्षतेने या पुरातन वास्तूंचे जतन केले जात आहे. तसेच जगातील सर्वांत मोठी आणि सशक्त लोकशाही हे बिरुद सार्थ करणार्‍या भारत देशाचे संविधान हे एकमेवाद्वितीय असे लिखित संविधान आहे. परंतु काही वेळा समाजविघातक प्रवृत्ती, भारताचे संविधान, राष्ट्रध्वज इत्यादींचा अवमान करणारे निंदनीय कृत्य करतात. त्यामुळे देशातील शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. इतकेच नव्हे तर जातीय तसेच धार्मिक विद्वेष पसरुन जनसामान्यांच्या जीविताला आणि मालमत्तेस तसेच राष्ट्रीय संपत्तीस हानी संभवते. परिणामी वैश्विक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने, राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे तसेच भारताचे संविधान यांच्या कोणत्याही प्रकारे अवमान करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याच्या धर्तीवर अजामीनपात्र गुन्हा करण्यासाठी एक स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom