भाजपच्या गटनेता बदलाच्या हालचाली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपच्या गटनेता बदलाच्या हालचाली

Share This


मुंबई - भाजपचे महापालिका गटनेते लोकसभा अधिवेशनात व्यस्त झाल्याने भाजपने मुंबई महापालिकेतील गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ज्येष्ठ नगरसेवक अतुश शहा, प्रकाश गंगाधरे आणि महापालिका निवडणुकीपर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रभाकर शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. यात कोणाला लॉटरी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेत मागील पाच वर्षांपासून मनोज कोटक भाजपच्या गटनेते पदाची धूरा सांभाळत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोटक यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्यानंतर महापालिकेतील त्यांची ये- जा कमी झाली आहे. महासभेतील विषयांवर पहारेकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी भाजप गटनेत्याची उणीव भासते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासंघर्षांत शिवसेना- भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली. राज्यातील भाजप नेतृत्वाचा शिवसेनेने खरपूस समाचार घेत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज कोटक यांच्यानंतर महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी पूर्णवेळ गटनेता देण्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु झाली आहे. ज्येष्ठ नगरसेवक अतुल शहा, प्रकाश गंगाधरे आणि प्रभाकर शिंदे यांची नावे यात आघाडीवर आहेत. अतुल शहा हे माजी आमदार म्हणून ओळखले जातात. आमदार पदाच्या त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळू शकतो. त्यामुळे शहा यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. तर प्रकाश गंगाधरे हे वरिष्ठ नगरसेवक आहेत. सुधार समिती अध्यक्ष पद भूषवले असून प्रशासनाच्या कामकाजाची त्यांना जाणीव आहे. तसेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता म्हणून त्यांनी एकेकाळी कार्यकाळ गाजवला आहे. विषयांची उत्कृष्ट मांडणी, सभांषण कौषल्याची अचूक जाण असल्याने ते सर्वात सरस ठरतात त्यामुळे शिंदे यांना गटनेते पदाची संधी मिळाल्यास ते कोटक यांची कमी भरुन काढतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लोकसभा अधिवेशन सुरु आहे. खासदार मनोज कोटक तिकडे व्यस्त आहेत. येत्या दोन दिवसांत महापौर पदाची निवडणुक होईल. त्यानंतर महापालिकेतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास अधिकृत गटनेता असावा, यासाठी चाचपणी सुरु आहेत. लवकरच गटनेता निवड केली जाईल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages