Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शिवसेनेकडून किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन ! - नसीम खान



मुंबई. दि. १० डिसेंबर २०१९ : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करुन अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला पाठिंबाच दिला आहे. विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी शिवसेनेने यावर खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना नसीम खान म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकसभेत मांडलेले नागिरकत्व सुधारणा विधेयक हे संविधान विरोधी असून लोकशाहीवरचा हल्ला आहे, अशा विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलेले नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करुन सरकार बनवलेले आहे. सत्ता स्थापन करण्याआधी सर्व मित्रपक्षांनी किमान समान कार्यक्रमही बनवलेला आहे, असे असताना शिवसेनेने घेतलेले ही भूमिका एकतर्फी आणि किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करणारी असून त्यांनी तातडीने यावर खुलासा केला पाहिजे, अशी मगणी नसीम खान यांनी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom