अर्थसंकल्पानं मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय केला: उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अर्थसंकल्पानं मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय केला: उद्धव ठाकरे

Share This

मुंबई: देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर या अर्थसंकल्पानं अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, असंही ते म्हणाले. आयडीबीआय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खासगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा आहे, असंही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages