४१ रुग्णांना घरी सोडले; राज्यात कोरोनाबाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

४१ रुग्णांना घरी सोडले; राज्यात कोरोनाबाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद

Share This

मुंबई,दि १: राज्यात आज कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात करोना मुळे ३ मृत्यूंची नोंद झाली. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू एक मृत्यू पालघर येथे झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत राज्यात करोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील:-
मुंबई – १८१
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) - ५०
सांगली - २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा - ३६
नागपूर - १६
यवतमाळ - ४
अहमदनगर - ८
बुलढाणा - ४
सातारा, कोल्हापूर प्रत्येकी - २
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी – १
इतर राज्य - गुजरात १
एकूण ३३५ त्यापैकी ४१ जणांना घरी सोडले तर १३ जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१२६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४१ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages