बालसुधारगृहात कोरोना - मानव अधिकार आयोगाकडे याचिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बालसुधारगृहात कोरोना - मानव अधिकार आयोगाकडे याचिका

Share This

मुंबई - मानखुर्द बालसुधारगृहात सध्या कोरोनाचा शिरकाव झाला असून याचे प्रमाण वाढते आहे. येथील एकूण ५४ विद्यार्थ्यांचे टेस्टिंग घेतल्यानंतर यातील ३० मुले कोवीड पॉझिटिव्ह सापडली आहेत. ही अत्यंत धक्कादायक स्थिती असून याच स्थिती संदर्भात किरीट सोमैया आणि दिनेश ( बबलू) पांचाळ यांनी मंगळवारी मानव अधिकार आयोगात याचिका दाखल केली आहे.

मानखुर्द बालसुधारगृहात मुले आणि कर्मचारी मिळून जवळपास ४५० जण राहतात. मुळात या मुलांना कोरोनाचा संसर्ग झालाच कसा? या मुलांच्या सुरक्षेसाठी सरकार काय उपाययोजना करत आहे? गेल्या ४ महिन्यांपासून तेथील कर्मचा-यांना पगारही मिळालेला नाही. सर्वच्या सर्व ४५० विद्यार्थी, कर्मचा-यांची तपासणी का झाली नाही? कोरोना संबंधी व्यवस्था नाही. या सर्व बाबी या याचिकेच्या माध्यमातून विचारण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्य सरकार, समाज कल्याण विभाग आणि मुंबई महानगरपालिका हे यात प्रमुख प्रतिवादी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages