राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी ५०० कोटी रूपये जमवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी ५०० कोटी रूपये जमवले

Share This

मुंबई: राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता, पैसा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला होता. कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलीस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भातल्या बैठका होत होत्या, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली, असल्याचे सचिन सावंत यांनी नमूद केले.

आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. गृहमंत्र्यांनी याबाबतीत त्यांच्या विभागाकडून माहिती घेतली आहे. राजस्थान सरकारच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केलेली कारवाई आणि मिळालेल्या ऑडिओ टेप्स मध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जात आहे, याला एकप्रकारे दुजोराच मिळत आहे. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालावे, अशी विनंतीही मी देशमुख यांना केली आहे व त्यांनी ती मान्य केली आहे, असे सावंत यांनी पुढे नमूद केले. लोकशाहीत असे अघोरी प्रकार करणाऱ्यांचे महाराष्ट्र भाजपातील मास्टमाइंड शोधले पाहिजेत, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages