मुंबईत कोरोनाचे १०४६ नवीन रुग्ण, ६४ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत कोरोनाचे १०४६ नवीन रुग्ण, ६४ रुग्णांचा मृत्यू

Share This

मुंबई - मुंबईत २४ तासांत कोरोनाच्या १०४६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या १०१२२४ झाली असून एकूण मृतांचा आकडा ५७११ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी रविवारी दिवसभरात तब्बल ११९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७१६८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या अॅक्टीव २३८२८ रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रविवारी धारावीत कोरोनाचे ३६ नवीन रुग्ण आढळले.  रुग्णांचा आकडा २,४८० झाला असला तरी यातील आतापर्यंत २,०८८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.‌ त्यामुळे धारावीत सध्या १४३ अक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, दादर व माहीम मध्ये दिवसभरात ३२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांची संख्या २,८८९ वर पोहोचली आहे. दादर मध्ये दिवसभरात १५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांची संख्या १,४०६ झाली आहे. तर माहीम मध्ये १७ रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा १,४८३ वर पोहोचला आहे ‌ दादर माहीम व धारावीत आतापर्यंत ५,३६९ रुग्ण आढळले असून यापैकी ४,१९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या तिन्ही भागात एकूण ७८७ अक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages