काँग्रेस जालौन जिल्हाध्यक्षाला महिलांनी कानफटवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काँग्रेस जालौन जिल्हाध्यक्षाला महिलांनी कानफटवले

Share This


उत्तर प्रदेश / जालौन : काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्हाध्यक्षाला दोन महिलांनी कानफटवले आणि त्याला चपलेने मारहाण केली. तो पाठलाग करत असून, त्रास देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ओराईतील स्टेशन रोडवर शनिवारी ही घटना घडली. पाठलाग करून त्रास देत असल्याचा आरोप करत दोन महिलांनी या नेत्याला त्याला मारहाण केली. या नेत्याला चपलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनुज मिश्रा हा काँग्रेसचा जालौन जिल्हाध्यक्ष असून, तो वारंवार फोन करून त्रास द्यायचा असा आरोप महिलांनी केला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशातील काँग्रेस कमिटी अध्यक्षांकडे तक्रार केली. मात्र, या नेत्याविरोधात त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आम्ही याबाबत पोलिसांतही तक्रार केली होती. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्यानं आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही. या नेत्याला बोलावून घेतले आणि त्याला लोकांसमोरच मारहाण केली, असे या महिलांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages