कोरोना योध्यांना कामावरून काढण्याच्या नोटीस, आता आमचे कुटूंब सांभाळा - मुख्यमंत्र्यांना आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोरोना योध्यांना कामावरून काढण्याच्या नोटीस, आता आमचे कुटूंब सांभाळा - मुख्यमंत्र्यांना आवाहन

Share This

मुंबई - मुंबईत कोरोनादरम्यान रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आली. मुख्यमंत्री आणि महापालिकेच्या आवाहनाला साद देता कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी कोरोना योध्ये पुढे आले. आज त्याच कोरोना योध्यांना कामावरून काढण्यात आले आहे तर अनेकांना कामावरून काढण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनांप्रमाणे मुंबईकर कुटुंबाची जबाबदारी आम्ही उचलली आज आम्हाला कामावरून काढले जात असल्याने आता आमच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेने उचलावी असे आवाहन कोरोना योध्यांनी केली आहे.

मुंबईमध्ये मार्च पासून कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने जम्बो कोवीड सेंटर उभारण्यात आली. या कोविड सेंटरमध्ये काम करण्यास डॉक्टर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री, मुंबई महापालिकेने कोरोना योध्यांनी पुढे येऊन रुग्णांची सेवा करावी असे आवाहन केले. या आवाहनानुसार हजारो लोक कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी पुढे आले. या कोरोना योध्यांनी रुग्णांना औषध देणे, रुग्णांना उचलणे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिक्स लोकांना त्यांच्या घरातून उचलून कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले. रुग्णाची सेवा करताना हे कोरोना योध्ये पॉझिटिव्ह आले, त्यांचे कुटूंबीयही पॉझिटिव्ह आले. पगार वेळेत मिळत नसतानाही त्यांनी कोरोना योध्ये म्हणून काम केले. आज रुग्ण कमी होत असल्याने या कोरोना योध्यांना कामावरून काढले जात आहे. आमच्या संपर्कात असलेल्या एक हजार कर्मचाऱ्यांपैकी दिडशेहून अधिक लोकांना कामावरून काढण्यात आले आहे. अनेकांना कामावर येऊ नका अशा नोटीस देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रमोद काटे यांनी दिली.

आम्हाला कामावरून काढून टाकले जात असल्याने आम्ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला पालिकेच्या कामात सामावून घेवू असे तोंडी आश्वासन दिले आहे. तरीही आम्हाला नोकरीवरून काढण्याच्या नोटिस येतच आहेत. यामुळे आमची नोकरी गेली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे असे काटे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आमचे कुटूंब सांभाळावे -
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही कोरोनाच्या महामारीत आपल्या आणि कुटूंबाच्या जीवाची परवा न करता काम केले. आम्हाला पगारही वेळेवर मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम राबवला. आम्हीही त्यात सहभागी झालो. आम्ही मुंबईकर आणि राज्यातील कुटूंबाची जबाबदारी घेतली. कोरोना रुग्णांची सेवा केली. आज आमच्या नोकऱ्या राहणार नसल्याने आमच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यत्र्यांनी घ्यावी असे आवाहन कोरोना योध्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages