…तर बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२७ डिसेंबर २०२०

…तर बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार !



अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गुंडाळून लावला. त्यामुळे केंद्र राज्यातील संघषार्तून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याची चिन्हं आहेत. त्यातच रेल्वे मंडळाचे अध्यक्षांनी जागा मिळण्यास विलंब झाल्यास फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेत दिले आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मागील आठवड्यात गुंडाळला. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्यावर बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारनं पुढील चार महिन्यात ८० जमीन उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे,’ असं यादव म्हणाले.

‘जर प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये धावेल. त्याचबरोबर जर जागा उपलब्ध करून देण्यास उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत,’ असं विनोद कुमार यादव म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS