आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या - नवाब मलिक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२४ डिसेंबर २०२०

आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या - नवाब मलिक



मुंबई दि. २४ डिसेंबर - आमच्या नेत्यावर टिका करताना आधी स्वतःची विश्वासार्हता तपासून घ्या... स्वतः विश्वासघातकी भूमिका घेता आणि कुठल्या तोंडाने आमच्यावर टिका करत आहात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे.

शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी टिका केली आहे. त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मंत्रीपदासाठी राजू शेट्टी यांचा विश्वासघात कुणी केला हे राज्याला माहीत आहे. यांचं राजकारणच विश्वासघातकी राहिलेलं आहे ते कुठल्या तोंडाने आमच्या नेत्यावर टिका करत आहेत असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS