विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी टाळा - धनंजय मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी टाळा - धनंजय मुंडे

Share This


मुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२१ रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविड आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गर्दी करू नये, शक्यतो यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सकाळी ६ ते ७ या वेळेत अभिवादन करणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, तसेच या भागातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत. शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतिक असलेल्या या प्रेरणास्थळाच्या ठिकाणी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श अभिवादन समारंभाला लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत या ठिकाणी गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून एक आदर्श निर्माण करावा, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages