लॉकडाऊन 31 जानेवारीपर्यंत.. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2020

लॉकडाऊन 31 जानेवारीपर्यंत..



मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारे लॉकडाऊन राज्य सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 31 जानेवारीपर्यंत ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून मुख्य सचिव संजयकुमार यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन त्यात टप्प्या- टप्प्याने शिथिलता आणली जाते आहे. कोरोनाचा प्रसार आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कऱण्यात आलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनची मुदत वाढवत असल्याचे राज्य सरकाने जाहिर केले आहे. कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. तसेच आधीच्या आपत्कालीन सर्व नियमावली लागू राहतील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

लोकलबाबत घोषणा नाही -
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमधून सर्व सामान्य नागरिकांना प्रवेश कधी दिला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकारकडून दरवेळी आढावा घेऊन लोकल सुरू केली जाईल, अशी तारीख पे तारीख दिली जात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला लोकल ट्रेन सुरू होईल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत. मात्र लॉकडाऊन वाढवताना सरकारने लोकल ट्रेनबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे लोकलसंदर्भात निर्णय झाल्यास घोषणा स्वतंत्रपणे होऊ शकते.

मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद -
मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून 31 डिसेंबर पर्यंत मुंबईमधील शाळा सुरू न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. 31 डिसेंबरपर्यंत रुग्णांची संख्या किती याचा आढावा घेऊन मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय. अन्य राज्यातील कोरोनाच्या स्थितीही भयानक आहे. तर इतर देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या, सर्व शाळा आणि विद्यालये, महाविद्यालये विद्यार्थ्यांकरिता 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad