पालिका एकत्र लढण्याचा निर्णय महाआघाडी घेईल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका एकत्र लढण्याचा निर्णय महाआघाडी घेईल

Share This


मुंबई - मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढवण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. तर, मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढण्याचे ठरले आहे, असे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत. 'मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षसंघटना बांधणीच्या कामास गेल्या फेब्रुवारीपासून आम्ही सुरुवात केली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या, परंतु करोनामुळे ते काम थांबले. आता सभा, बैठका पुन्हा सुरू झाल्या आहेत. रविवारी नितीन देशमुख यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले', असे मलिक म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages