मुंबई - मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पालिकेच्या शिक्षण विभागाने १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्टर देशातील दुतावासांच्या शाळा १८ जानेवारीपासून सुरु केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील आदेश शाळांना दिले आहेत.
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाशी मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग लढा देत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ३१ डिसेंबर पर्यंत मुंबईमधील शाळा सुरु केल्या जाणार नाहीत असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. ३१ डिसेंबरपर्यंत रुग्णांची संख्या किती याचा आढावा घेऊन मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आढाव घेण्याचे काम सुरु आहे. या आढवादरम्यान मात्र, अन्य राज्यातील कोरोनाच्या स्थितीही भयानक आहे. तर इतर देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या, सर्व शाळा आणि विद्यालये, महाविद्यालये विद्यार्थ्यांकरिता १५ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शालेय व्यवस्थापन आणि माध्यमांना तसे निर्देश पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत. दुतावासांच्या शाळा १८ जानेवारी पासून सुरु करण्यास पालिकेने संमती दर्शवली आहे. मात्र कोविडबाबत खबरदारी, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक निकष पाळणे, संबंधितांना बंधनकारक आहे. महापालिका शिक्षण विभाग यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे.
शिक्षण विभाग सज्ज -
कोरोनाचा प्रसार कमी झाला असली तरी नव्या प्रकारामुळे लोकांच्या मनात भीती आहे. सध्या तरी शाळा सुरु करण्यास संमती दिलेली नाही. मात्र, १५ जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याबाबत पालिका आयुक्तांनी आदेश दिल्यास शिक्षण विभाग सज्ज आहे, अशी माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment