औरंगाबाद’च्या नामांतरावर भाजपची दुटप्पी भूमिका - आदित्य ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०७ जानेवारी २०२१

औरंगाबाद’च्या नामांतरावर भाजपची दुटप्पी भूमिका - आदित्य ठाकरे



मुंबई - औरंगाबाद’च्या संभाजीनगर नामांतरावरून वाद सुरु आहे. यावर भाजपकडून आरडा ओरड सुरू आहे. मात्र यावर लवकरच तोडगा निघेल असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावरून भाजपकडून नाहक टिका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाच वर्षे सत्तेत असताना नामांतराबाबत काही केले नाही, आणि आता आरडाओरडा सुरू असून भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरावरून सद्या राजकीय वाद सुरु आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध केला असल्याने शिवसेनेची यावरून कोंडी झाली आहे. शिवसेना - भाजप यावर आमने सामने आले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नामांतरावर लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले. दोन दिवसांत आपण दौर्‍यावर जाणार असून या ठिकाणी सुरू असणार्‍या विकासकामांचा आढावा घेणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

भाजपकडून यावर आरडाओरडा सुरु आहे, मात्र त्यांनी सत्तेत असताना पाच वर्ष काय केले? असा सवाल विचारत भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोविड आता चांगलाच नियंत्रणात आल्यामुळे मुंबईसह राज्यात विकासकामे वेगाने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपला टिका करू द्या, आम्ही आमचे काम करीत राहणार असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS