मुंबई महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार

Share This


मुंबई - काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतः 227 जागांवर लढू इच्छिते. मी पदभार स्वीकारल्यानंतर तेच बोललो होतो. आजही मी त्यावर ठाम असल्याचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

अनेक नेते काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांना पुन्हा परत आणणार. त्यांची घरवापसी केली जाणार असून, 100 दिवसाच्या कार्यक्रमात अनेक नेते काँग्रेसमध्ये येतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा महापालिकेत विरोधीपक्ष नेता कोण असावा याचा निर्णय काँग्रेसच घेणार. याचा कोणताही परिणाम सरकार आणि महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, असेही जगताप यांनी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईकरांच्या ५०० चौरस फूट घरांसाठी प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला, आणि त्याची अंमलबजावणी करताना मात्र केवळ एकच जनरल टॅक्स माफ करण्यात आला. आणि यातून कोट्यवधी मुंबईकरांची फडणवीस सरकारने घोर फसवणूक केली, असा आरोप जगताप यांनी केला. महविकास आघाडी सरकारने जो सुरुवातीला जीआर निघाला तो पूर्ण लागू करावा. मुंबईकरांचा पूर्ण टॅक्स माफ करावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

झोपडपट्टीधारकांना मोफत पाणी पुरवठा करा - 
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत पाणी पुरवठा करावा. महिन्याला या झोपडपट्टी धारकांचे पाणी बिल 500 कोटी इतके येते. यातून महापालिकेच्या तिजोरीवर केवळ 162 कोटींचा बोजा पडेल. पण, लाखो गरिबांना त्याचा फायदा मिळेल. तसेच, मुंबईतील पाणी माफिया कोट्यवधी रुपयांची पाणी चोरी करत असतात. त्याला आळा घालावा, अशी मागणी देखील जगताप यांनी केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages