मुंबईत ६३१ नवीन रुग्ण - ९ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ६३१ नवीन रुग्ण - ९ रुग्णांचा मृत्यू

Share This


मुंबई - मुंबईत २४ तासांत ६३१ नवीन रुग्ण आढळले असून ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २९४०६७ झाली असून एकूण मृतांचा आकडा १११२५ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी शुक्रवारी दिवसभरात ६२८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २७४०७२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या ८००५ अॅक्टीव रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

धारावीत दिवसभरात ०२ नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या ३८१३ झाली आहे. यातील आतापर्यंत ३४८२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत १९ सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्येही दिवसभरात ०१ नवीन रुग्ण सापडला. येथील रुग्णांची संख्या ४७८५ झाली आहे. मात्र यातील ४५३० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या येथे ८२ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिममध्ये ०८ नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्णांची संख्या ४६०९ वर पोहचली आहे. मात्र यातील ४२४९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव रुग्ण २१६ आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages