नागपूरात नायलॉन मांजाने तीन बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नागपूरात नायलॉन मांजाने तीन बळी

Share This


नागपूर : नायलॉन मांजाने गळा कापून तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरात घडली आहे. प्रणय ठाकरे (वय २०) असं या तरूणाचं नाव आहे. गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे.

यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांनी नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. प्रणय आपल्या दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी दोघे जण अडकलेला मांजा ओढत होते. यावेळी मांजाने प्रणयचा गळा कापला गेला. लोकांनी त्याला हॉस्पीटलमध्ये भरती करेपर्यंत खूप रक्तस्त्राव झाला होता. हॉस्पीटलमध्ये नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages