शक्ती कायदा, नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात - गृहमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शक्ती कायदा, नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात - गृहमंत्री

Share This




मुंबई, दि. 4 : माता-भगिनी बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन समिती प्रमुख तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा अन्य काही सुधारणा सुचवू शकतात.

या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या विधेयकाची प्रत www.mls.org.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. संबंधितांनी आपल्या सूचना सुधारणा निवेदनाच्या स्वरूपात तीन प्रतीमध्ये विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळ, बॅकबे रेक्लेमेशन मुंबई येथे किंवा a1.assem-bly.mls@gmail.com या ईमेलवर 15 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages