कोरोना - राज्यात ४,३८२ नवीन रुग्ण, ६६ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोरोना - राज्यात ४,३८२ नवीन रुग्ण, ६६ रुग्णांचा मृत्यू

Share This


मुंबई - आज राज्यात ४,३८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,५४,५५३ वर पोहचला आहे. राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,८२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५०,८०८ ऍकक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २,५७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८,५२,७५९ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३१,३४,०१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५४,५५३ नमुने म्हणजेच १४.८८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,३३,८७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५०,८०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages