मुंबईत ७९५ नवीन रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ७९५ नवीन रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू

Share This


मुंबई - मुंबईत २४ तासांत ७९५ नवीन रुग्ण आढळले असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २,९६,३१९ झाली असून एकूण मृतांचा आकडा ११,१५५ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी बुधवारी दिवसभरात ४०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २,७६,८१३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या ७४८० अॅक्टीव रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 365, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 195 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 1 हजार 985 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 24 लाख 30 हजार 972 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages