राज्यात ३,२८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात ३,२८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Share This


मुंबई - आज राज्यात ३,२८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,४२,१३६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ४९,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.56 टक्के एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज २,०६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोवर मात केलेल्या रुग्णांचा एकूण आकडा १८,३६,९९९ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात सध्या ५४,३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या निदानासाठी राज्यात १,२९,५८,५०२ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages