मुंबईत ५८१ नवीन रुग्ण, ३ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०३ जानेवारी २०२१

मुंबईत ५८१ नवीन रुग्ण, ३ रुग्णांचा मृत्यू


मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या नियंत्रणात आली असून मृतांचा आकडाही घटला आहे. २४ तासांत ५८१ नवीन रुग्ण आढळले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २९५२४० झाली असून एकूण मृतांचा आकडा १११३५ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी रविवारी दिवसभरात ६९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २७५४६४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या ७७७१ अॅक्टीव रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

 धारावीत दिवसभरात ०३ नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या ३८२१ झाली आहे. यातील आतापर्यंत ३४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत २१ सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्येही दिवसभरात ०३ नवीन रुग्ण सापडले. येथील रुग्णांची संख्या ४७९४ झाली आहे. मात्र यातील ४५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या येथे ८६ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिममध्ये ०४ नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्णांची संख्या ४६१५ वर पोहचली आहे. मात्र यातील ४२५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव रुग्ण २१५ आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS