कोरोना लसीकरण - आरोग्य समिती अध्यक्षांनी घेतला आढावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2021

कोरोना लसीकरण - आरोग्य समिती अध्यक्षांनी घेतला आढावा



मुंबई - कोरोना लसीकरणासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. यापार्श्वभूमीवर वांद्रेतील भाभा रुग्णालयातील लसीकरण केंद्राचा आरोग्य समिती अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला. प्रत्येक केंद्रात विशेष दक्षता पथक तैनात केल्याची माहिती दिली.

मुंबईत कोरोना लसीकरणाला अल्पावधीतच सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख वैद्यकिय क्षेत्रातील नागरिकांना लस टोचली जाईल. लसीकरणासाठी मनपाने तयारी केली असून ठिकठिकाणी केंद्रे उभारली आहेत. आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी वांद्रे भाभा रुग्णालय केंद्राची पाहणी केली. २४ तास डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी उपलब्ध असतील. लसीकरणाचे काम सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळांत पार पडेल. एका केंद्रावर १०० नागरिकांना लस दिली जाईल. मात्र, लस घेणापूर्वी संबंधित व्यक्तिला कोविन अॅपद्वारे नाव नोंदणी करावी लागेल. आधारकार्ड यासाठी बंधनकारक आहे. पल्स, तापमान तपासणीनंतरच टोकन देऊन लस देण्यात येईल. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धातास देखरेखीखाली ठेवले जाईल. दरम्यान, काही त्रास झाल्यास अति दक्षता कक्षाद्वारे उपचार केले जातील. प्रत्येकाला डॉक्टरांचा दुरध्वनी क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे घरी गेल्यानंतर काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांशी थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. लसीकरणात धोका टाळता यावा, यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचे मोरजकर यांनी सांगितले. डॉ. पष्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि डॉ. सातोसकर यांनी लसीकरण केंद्रातील तयारीविषयी माहिती दिल्याचे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS