मुंबईत कोरोना वाढतोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत कोरोना वाढतोय

Share This


मुंबई - मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १६ फेब्रुवारीला ४४१ वर असलेली रुग्णसंख्या २० फेब्रुवारीला अवघ्या पाच दिवसांत दुपटीने ८९७ वर म्हणजे ४३६ रुग्ण वाढले आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ४४५ दिवसांवरून ७४ दिवसांनी कमी होऊन ३७१ दिवसांवर घसरला आहे. मुंबईतील काही भाग कोरोनाच हॉटस्पॉट ठरत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका सतर्क झाली आहे. पुढील १५ दिवस महत्वाचे असून मुंबईकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यांत मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेचा लढा सुरु आहे. विविध मोहिमा, चाचण्या, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना तात्काळ शोधून त्यांना क्वारंटाईन करणे, आरोग्य तपासणी, कंटेनमेंट झोनमध्ये प्रभावी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी आदींमुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यामुळे टप्प्या- टप्प्याने अनलॉक प्रक्रियाही सुरु करण्यात आली. १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकलचे दरवाजे खुले करण्यात आले. मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आली तरी कोरोनाचा धोका कायम होता. मुंबईकरांनी कोरोनाला सिरिएसली घेतले नाही. वाढलेली गर्दी व त्यात विनामास्क, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष यामुळे कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले. १६ फेब्रुवारीला ४४१ वर असलेली रुग्णसंख्या २० फेब्रुवारीला अवघ्या पाच दिवसांत दुपटीने तब्बल ८९७ वर म्हणजे ४३६ रुग्ण वाढले आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ४४५ दिवसांवरून ७४ दिवसांनी कमी होऊन ३७१ दिवसांवर घसरला आहे.

एकूण कंटेनमेंट झोन - ९३
सीलबंद इमारती - १,३०५
रुग्ण दुपटीचा कालावधी - ३७१ दिवस
बरे झालेल्या रुग्णांचा दर -९४ टक्के
१३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोविड वाढीचा दर - ०.१९ टक्के

असे वाढले रुग्ण -
९ फेब्रुवारी - ३७५
१० फेब्रुवारी - ५५८
११ फेब्रुवारी - ५१०
१२ फेब्रुवारी - ५९९
१३ फेब्रवारी - ५२९
१४ फेब्रुवारी - ६४५
१५ फेब्रुवारी - ४९३
१६ फेब्रुवारी - ४६१
१७ फेब्रुवारी - ७२१
१८ फेब्रुवारी - ७३६
१९ फेब्रुवारी - ८२३
२० फेब्रुवारी - ८९७

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages